हिंसा थांबवण्याच्या बदल्यात अफगाणिस्तान सरकारने तालिबानला सत्तेत वाटा देऊ केला आहे. हा प्रस्ताव अफगाणिस्तानने कतारमध्ये तालिबानसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मांडला होता. Taliban rule in Afghanistan Proposed partnership with the government to prevent violence
वृत्तसंस्था
काबुल : अफगाणिस्तानच्या सत्तेत आता तालिबानला वाटा मिळू शकतो. तालिबानशी शांतता चर्चेदरम्यान अफगाणिस्तान सरकारच्या मध्यस्थांनी तालिबानला ही ऑफर दिली आहे.
हिंसा थांबवण्याच्या बदल्यात अफगाणिस्तान सरकारने तालिबानला सत्तेत सहभाग प्रस्तावित केला आहे. हा प्रस्ताव अफगाणिस्तानने कतारमध्ये तालिबानसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मांडला होता.
वृत्तसंस्था एएफपीने गुरुवारी ही माहिती दिली की “होय, सरकारने ही ऑफर कतारला दिली आहे, जो तालिबानशी चर्चेमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत आहे.” या प्रस्तावाअंतर्गत तालिबानने हिंसा थांबल्यास सरकारमध्ये भागिदारी देऊ केली आहे. ‘
अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबान आक्रमक झाला आहे आणि आतापर्यंत हिंसाचाराच्या आधारावर त्याने अफगाणिस्तानच्या 34 पैकी 10 प्रांतांच्या राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. गुरुवारी तालिबान्यांनी राजधानी काबूलपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गझनी शहरावर कब्जा केला. तेव्हापासून तालिबान्यांनी देश ताब्यात घेण्याची भीती वाढली आहे.
काबूलचे प्रवेशद्वार म्हणून पाहिले जाणारे गझनी, तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यापासून अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्यानेही याला दुजोरा देत म्हटले की, “शत्रूने शहराचा ताबा घेतला आहे.”
तालिबानने अफगाणिस्तानच्या उत्तर आणि पश्चिम भागांवर ताबा मिळवला आहे. आता तो दक्षिणेकडे वाटचाल करत आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबानला अनेक वेळा चर्चेची ऑफर दिली होती, पण त्याने ती नाकारली. तालिबानने म्हटले आहे की कोणतीही चर्चा तेव्हाच होऊ शकते जेव्हा राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या पदावरून पायउतार होतील.
यावर्षी मे महिन्यात वॉशिंग्टनमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अफगाणिस्तानात हिंसाचार प्रचंड वाढला आहे.
अमेरिकन सैन्याच्या दबावाखाली गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणात होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. एवढेच नाही तर अमेरिकेने कोणत्याही नियोजनाशिवाय अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणतात की ही अफगाणांची लढाई आहे आणि त्यांना त्यांच्या सर्व शक्तीने लढावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App