आयएएस टॉपरच्या प्रेमकहाणीचा अखेर शेवट, काश्मीरी सून टीना डाबी आणि अतहर आमिर यांनी घेतला घटस्फोट

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) प्रथम क्रमांक मिळविणारी टीना डाबी आणि द्वितीय क्रमांक पटकावेला काश्मीरी तरुण अतहर आमीर यांची मसूरीतील प्रशिक्षणादरम्यानच प्रेमकहाणी फुलली. काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात विवाह झाल्यावर टीना स्वत:ला काश्मीरी सूनही म्हणवून घेत होती. मात्र, तीन वर्षांतच त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे.  IAS topper’s love story ends, Kashmiri daughter-in-law Tina Dabi and Athar Aamir divorce


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) प्रथम क्रमांक मिळविणारी टीना डाबी आणि द्वितीय क्रमांक पटकावेला काश्मीरी तरुण अतहर आमीर यांची मसूरीतील प्रशिक्षणादरम्यानच प्रेमकहाणी फुलली. काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात विवाह झाल्यावर टीना स्वत:ला काश्मीरी सूनही म्हणवून घेत होती. मात्र, तीन वर्षांतच त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भोपाळच्या टीना डाबी यांनी सन २०१५ मध्ये भ्यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. याच बॅचमध्ये दुसरे स्थान पटकावणारे अतहर आमिर यांच्याशी टीनाची प्रेमकहाणी सुरू झाली. तीन वर्षांपर्यंत प्रेमात असलेल्या डाबी आणि अतहर यांनी काश्मीरमधील पहलगाम हे स्थळ आपल्या विवाहासाठी निवडले होते. टीना यांनी आपले आडनावही बदलून खान केले होते.

मात्र, त्यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. या दोघांनाही राजस्थान केडर मिळाले होते. मात्र, वर्षभरातच त्यांच्या नातेसंबंधांमध्ये धुसफूस सुरू झाली. आयएएस अधिकाºयांना पती-पत्नी एकत्रिकरण योजनेत एकाच जिल्ह्यात पोस्टींग मिळते. मात्र, राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यात या दाम्पत्याची पोस्टींग केली.

तेव्हा सर्वांना समजले की, यांच्या नात्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी जयपूर येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघे एकत्र राहत नव्हते. त्यांच्या घटस्फोटावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आयएएस टॉपरच्या या प्रेमकहाणीचा अखेर शेवट झाला आहे.

IAS topper’s love story ends, Kashmiri daughter-in-law Tina Dabi and Athar Aamir divorce

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात