विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खेळाडूंचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना हक्कही मिळवून द्यायला हवा. फोन कॉल खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. Rahul Gandhi Targets Modi Govt.
राहुल गांधी यांनी नीरज चोप्राचे जुने ट्विटसचे फोटो आपल्या पोस्टबरोबर शेअर केले. त्यात म्हटले की, आपण खेळाडूंना जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम तात्काळ द्या. आपण या गोष्टीत फार काळ न अडकता संपूर्ण लक्ष आगामी ऑलिंपिक खेळाकडे केंद्रीत करू. जेणेकरून आपले खेळाडू देशाचे, राज्याचे नाव उंचावू शकतील.
राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे ‘INC TV’चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा दिला हवाला
चोप्राचे एक जुने ट्विट आहे. त्यात म्हटले की, आम्ही जेव्हा पदक जिंकून येतो, तेव्हा संपूर्ण देश आनंदी होतो. आपणही अभिमानाने हा हरियानाचा खेळाडू आहे, असे म्हणतो. हरियानाच्या खेळाडूंनी क्रीडा जगात वेगळी छाप निर्माण केली आहे. दुसरे राज्य देखील हरियानचे दाखले देतात. कृपया हे दाखले कायम राहू द्या. हे दोन्ही ट्विटस वाचल्यानंतर असे लक्षात येते की, भारताला सुवर्णपदक जिंकून देणारे नीरज चोप्रा हे स्वत:च अडचणीचा सामना करत आहेत. राहुल गांधी यांनी यासंदर्भात सरकारवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App