कोरोनामुळे पालटले नशीब, रस्त्यावरील खाद्यविक्रेते बनलेत कोट्याधीश, पानवाले, चाट-सामोसेवाले कमवताहेत लाखो रुपये

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रस्त्यावरील खाद्यविक्रेते कोट्याधीश असल्याचे आणि आयकर विभागाने त्यांच्या उत्पन्नाचा शोध कसा घेतला याच्या सुरस कहाण्या नेहमीच सांगितल्या जातात. परंतु, उत्तर प्रदेशातील कानपूरच्या आयकर विभागाने केलेल्या तपासात पान, सामोसा, चाट यासारखे रस्त्याच्या कडेला नाश्ता आणि खाद्यपदार्थ विकणारे २५६ कोटी लोक कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे.Corona changed fortunes, street food vendors became millionaires

आयटी विभागाच्या डेटा सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक साधनांद्वारे केलेल्या जीएसटी नोंदणी तपासणीमध्ये ही माहिती प्रकाशात आलीआहे.पुण्यातील गार्डन वडापाव नावाच्या एका रस्त्यावरील हातगाडीमालकाचे उत्पन्न आयकर विभागाने उघड केले होते.यासाठी काही दिवस आयकर विभागाचे अधिकारी हातगाडीच्या परिसरातील वडापाव बांधून दिलेले कागद गोळा करत होते, असेही सांगितले जाते.



असेच काहीसे कानपूर आयकर विभागाने केले आहे. या २५६ लोकांमध्ये ६५ लहान किराणा दुकान मालक आणि केमिस्ट आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

जीएसटी नोंदणीबाहेरील कर गेल्या काही वर्षांत या छोट्या विक्रेत्यांकडून भरले जात नसल्याचेही आढळून आले. काहींच्या जीएसटी रेकॉर्डमध्ये त्यांचे व्यवसाय नोंदणीकृत नव्हते. कानपूरमध्ये बाराहून अधिक रस्त्यावरील खाद्या विक्रेत्यांचे ६० कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न असल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी उजेडात आल्या आहेत. अलीगढमधील एका कचौरी विक्रेत्याची वार्षिक उलाढाल अंदाजे 60-70 लाख रुपये इतकी होती. तरीही मालकाने कर भरला नाही किंवा आपला व्यवसाय जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत केला नाही.

बेकोनगंजमधील दोन आणि लालबंगला परिसरातील दोन भंगार विक्रेत्यांनी दोन वर्षांत 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या तीन मालमत्ता खरेदी केल्या. आर्यनगरमधील दोन पानपट्टीवाल्यांनी कोरोनाच्या काळात 5 कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मॉलरोडमध्ये एक जण सकाळी नाश्ता विकतो.

त्याच्या वेगवेगळ्या गाड्यांचे महिन्याचे भाडेच सव्वा लाख रुपये आहे. याचा अर्थ त्याची प्राप्ती किती असेल याची कल्पनाच केलेली बरी. अनेक चाट विक्रेत्यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊनने अनेक व्यावसायिकांना उध्दवस्त केले. मात्र, याच महामारीमुळे काही जणांचे नशीब पालटले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने खाद्य पदार्थ विक्रेते, किराण आणि मेडीकल दुकानदार आहेत.

Corona changed fortunes, street food vendors became millionaires

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात