विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी अमरजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. सामाजिक क्षेत्रासंबंधिच्या योजनांची जबाबदारी त्यांच्याकडे होती.Adviser to PM’s Office Amarjit Sinha resigns
अमरजित सिन्हा हे बिहार कॅडरचे १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. ते २०१९ मध्ये ग्रामसचिव पदावरून निवृत्त झाले होते.गेल्या वर्षी फेब्रुवारीत अमरजित सिन्हा यांच्यासह भास्कर खुळबे यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
दोन्ही निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली होती. त्यांना सचिवाच्या समान पद आणि वेतन देण्यास मंजुरी दिली गेली होती. करारानुसार ही नियुक्ती २ वर्षांची होती. पुढील आदेशानंतर त्यात वाढही केली गेली असती. पण अमरजित सिन्हा यांनी कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामाच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
गेल्या काही महिन्यांत पंतप्रधान कार्यलयातून राजीनामा देणारे सिन्हा हे दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सल्लागार आणि माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App