विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात याआधी भीतीचे साम्राज्य होते. महिला असुरक्षित होत्या, भूमाफिया गरिबांच्या जमिनी बळकावत होते. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर गोळीबाराच्या घटना, दंगली घडत होत्या.Amit Shah praises Yogi in UP
मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याला आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अव्वल स्थानी नेल्याचे प्रशस्तीपत्रक खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. शहा यावेळी म्हणाले, की मी २०१९ पर्यंत सहा वर्षे उत्तर प्रदेशात भरपूर फिरलो.
योगी ज्या खुर्चीवर बसले आहेत, ती जनतेची संपत्ती – प्रियांका गांधींचा हल्लाबोल
त्यामुळे, या राज्याची पूर्वीची स्थिती मला चांगली माहित आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात भितीचे वातावरण होते. त्यामुळे, लोक स्थलांतर करत होते. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशला विकसित राज्य करण्याचे तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारविण्याचे आश्वासन भाजपने दिले होते.
त्यानंतर, आज २०२१ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशला कायदा व सुव्यवस्थेबाबत अव्वल स्थानावर नेले, असे मी अभिमानाने म्हणू शकतो, असेही ते म्हणाले. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांची आदित्यनाथ सरकारकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App