विशेष प्रतिनिधी
राहता : तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांना गाय विकली हे ऐकून चकित झालात ना ? पण, होय हे सत्य आहे.अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत गाय खरेदी केली आहे.Cow sales for 1 lakh 60 thousand Ruppes
विशेष म्हणजे चांगली किंमत मिळाल्याने शेतकरी अरुण कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता.कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथील रहिवासी अरूण रघुनाथ कदम यांनी एच.एफ. होस्टेन या गाय विकली आहे.
कदम म्हणाले की, मागील वेतामध्ये गायीचे २७ लिटर दूध दिले होते. या वेळेला ३० लिटरच्या पुढे गाय दूध देईल. गोठ्यात सर्व एच. एफ. होस्टेन जातीच्या गायी आहेत. खाद्य, चारा, पोषक घटकांचा समावेश खुराकामध्ये केलेला असतो.
एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केली असल्याने मेहनतीच्या जोरावर भरघोस उत्पन्न मिळत आहे.यावेळी कोळपेवाडी येथील मध्यस्त राजेंद्र महाजन, व्यापारी सिकंदर पठाण व अरुण कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान गाईचा सांभाळ केलेल्या कदम कुटुंबीयांनी गळ्यात पडत साश्रूनयनांनी दिलेला निरोप बघता गावकरीही भावूक झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App