वीजपुरवठा खंडित, कर्जासाठी तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली नक्षलवादी होण्याची परवानगी

बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला. बॅंक हप्त्यासाठी तगादा लावत आहे, यामुळे सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. Farmers seek permission from CM to become Naxalites


प्रतिनिधी

अमरावती : बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला. बँक हप्त्यासाठी तगादा लावत आहे, यामुळे सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने नक्षलवादी होण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठविले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, साहेब, विकलं तेच पिकलं ही योजना सुरु केली, मात्र पिकलंच नाही तर विकणार काय, अजूनही बँकेचे अधिकारी कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे, विद्युत पंपाचा विज पुरवठा खंडीत केला आहे. या परिस्थितीत जगणे कठीण झाले असून आता नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी.शेती हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. शेतावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र मागील काही वर्षात शेतीमध्ये लागवडीचा खर्चही निघाला नाही. शासनाची कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. एवढेच नव्हे तर शासनाने विकल तेच पिकल ही योजना हाती घेतली.

मात्र यात पिकलेच नाही तर विकणार काय असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. जिल्हयातील अनेक शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे बँकेकडे धूळ खात पडलेली आहेत. बँकेकडून पिक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

तर मागील कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. त्यातच भर म्हणजे विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा वीज कंपनीने सुरु केला आहे. आता गहू व इतर पिकांना पाणी देण्याची वेळ असतांना वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने गव्हाचे पिक देखील हाती येणार नाही.

वीज कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यावर्षीही बँका पीककर्ज देण्यास तयार नाहीत त्यामुळे नक्षलवादी होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

Farmers seek permission from CM to become Naxalites

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*