dowry harassment : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा गवई हिने नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गवई या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कन्या आहेत. Daughter of Supreme Court Justice Bhushan Gavai filed a case of dowry harassment against 5 including husband in Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा गवई हिने नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा गवई या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कन्या आहेत.
करिश्मा यांचे काही दिवसांपूर्वी 8 वर्षे लहान तरुणाशी लग्न झाले होते. आता करिश्मा यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. करिश्मा यांचे सासरे पुरुषोत्तम दरोकर, ललिता दाोकर, मामा संजय टोंगसे, पती पलाश दरोकर आणि प्रशांत टोंगसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल असून पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी करिश्मा यांच्या तक्रारीनंतर भादंवि कलम 498 ए, 323, 294, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यासह पोलिसांनी या आरोपींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांकडून पती पलाशसह प्रशांतचा शोध घेण्यात येत आहे.
Daughter of Supreme Court Justice Bhushan Gavai filed a case of dowry harassment against 5 including husband in Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App