वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे केरळ राज्यातून देशभरात तिसऱ्या लाटेचा अधिक प्रादुर्भाव होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण केरळात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. Fear of third Coronavirus wave in the country coming from Kerala, Corona patients are on the rise, In Northeast India situation worsening
देशात गेल्या२४ तासांत देशात तब्बल ४१ हजार ६४९ नवे रुग्ण समोर आले आहेत. तसेच ५९३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यं ४ लाख २३ हजार ८१० जण दगावले आहेत.
कोरोनाला रोखण्याण्साठी केरळने केलेले प्रयत्न जगभरात नावाजले होते. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र तेथील मृत्युदर कमी आहे. गेल्या चार आठवड्यांपासून देशातील २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात सात जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आली नसली तरी तिची सुरुवात केरळमधून होण्याची शक्यता जात आहे. या राज्याचा एकूण संसर्गदर १२.९३ टक्के असून दर आठवड्याचे प्रमाण ११.९ टक्के आहे. देशात केरळमध्ये अँटिबॉडीज तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. चौथ्या सिरो सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदविले आहे.
ईशान्य भारतातील १३ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या ५ राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. मेघालयमधील पश्चिम गारो हिल्स प्रदेशात कोरोना रुग्णांची आकडेवारी ११० टक्क्यांनी वाढली. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांगमध्ये व मणिपूरमधील नोने भागात हे प्रमाण अनुक्रमे ३०० टक्के व २६६ टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App