विशेष प्रतिनिधी
सिल्चर – आसाम व मिझोराम सीमेवरील आंदोलनाचे केंद्र बनलेल्या आसामच्या बराक खोऱ्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून सध्या कोणत्याही संघटनेची रस्त्यांवर निदर्शने सुरू नसल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.Situation in Assam get normalized
ज्या जागेवरून दोन्ही राज्यांमध्ये संघर्ष पेटला होता त्याजागी आता निमलष्करी दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. येथे त्यांची भूमिका ही शांती सैनिकांसारखी असेल.
तत्पूर्वी सोमवारी झालेल्या संघर्षानंतर या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता,याचा फटका सार्वजनिक वाहतुकीला देखील बसला होता. शेजारील राज्यांमध्ये जाणारे अनेक ट्रक हे रस्त्यांवरच अडकून पडले होते.
मिझोरामच्या सीमेला लागून असणाऱ्या धोलाई खेड्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. या तणावाच्या काळामध्ये अनेक मालवाहू गाड्यांनी त्रिपुरामार्गे मिझोराममध्ये जाण्याचा पर्याय स्वीकारला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App