बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Nandu Natekar Passes Away: Great badminton player Nandu Natekar passes away
1961 साली नंदू नाटेकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
नंदू नाटेकर यांनी तब्बल सहा वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी देखील त्यांनी गाठली होती.
विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच आज सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 88 वर्ष होतं. पुण्यात त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नंदू नाटेकर हे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. 1956 साली त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं.
नंदू नाटेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गौरव आणि दोन मुली असा परिवार आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता शोकसभेचं आयोजन करण्यात येणार नाही. कृपया आपल्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवा.असे आवाहन नंदू नाटेकर यांचे पुत्र गौरव नाटेकर यांनी केले आहे .
Shri Nandu Natekar has a special place in India’s sporting history. He was an outstanding badminton player and a great mentor. His success continues to motivate budding athletes. Saddened by his demise. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) July 28, 2021
Shri Nandu Natekar has a special place in India’s sporting history. He was an outstanding badminton player and a great mentor. His success continues to motivate budding athletes. Saddened by his demise. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2021
नंदू नाटेकर यांचा जन्म मे 1933 साली सांगली येथे झाला होता. त्यांनी आपल्या आवडीनुसार बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यात ते प्रचंड यशस्वी देखील ठरले होते. त्याआधी त्यांनी क्रिकेटमध्ये देखील हात आजमावून पाहिला होता आणि त्यानंतर टेनिस देखील खेळले होते. ते ज्युनिअर लेव्हलला खेळले होते. तसंच प्रसिद्ध खेळाडू रामनाथन कृष्णन विरूद्ध देखील त्यांना सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App