प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री मायावती यांनी 2007 चा दलित ब्राह्मण फॉर्म्युला वापरण्याचे ठरवल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील त्याच मार्गाने जायचे ठरवले आहे. Akhilesh yadav’s samajwadi party too will hold brahmin samelans in uttar Pradesh
मायावतींचा बहुजन समाज पक्ष सध्या राज्यात ब्राह्मण संमेलने घेत आहे. तशी संमेलने समाजवादी पक्ष ही ऑगस्ट महिन्यात घेणार आहे. ब्राह्मण समाजाच्या प्रस्थापित पाच नेत्यांनी अखिलेश यादव यांची आज भेट घेऊन समाजवादी पक्षाच्या ब्राह्मण संमेलनाचे नियोजन केले. महू, आजमगड, गाजीपूर, उन्नाव आदी ठिकाणी ही संमेलने होणार आहेत.
विधानसभेचे माजी अध्यक्ष माता प्रसाद पांडे माजी मंत्री मनोज पांडे सनातन पांडे आदी नेत्यांचा या नियोजनात समावेश आहे. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना ब्राह्मण समाजाचे समाजवादी पक्षाकडून 21 आमदार विधानसभेत होते ही ताकद पुन्हा निर्माण करण्याचा अखिलेश यादव यांचा इरादा आहे.
या नेत्यांनी अखिलेश यादव यांना भगवान परशुराम यांची प्रतिमा देखील भेट दिली. समाजवादी पक्षाचे राजकारण नेहमी यादव आणि मुस्लिम मतांच्या बेरजेवर आधारित राहिले आहे. त्यामध्ये अखिलेश यादव यांना ब्राम्हण मतांची भर टाकायची आहे म्हणून समाजवादी पक्ष देखील मायावतींच्या पावलावर पाऊल टाकून ब्राम्हण संमेलने घेणार आहे.
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे पारंपारिक राजकारण ब्राह्मण, बनिया आणि ठाकूर या समाजांच्या विरोधात राहिले आहे. परंतु उत्तर प्रदेशात सत्तेवर येण्यासाठी फक्त आपापल्या जातींच्या एकगठ्ठा मतांचा उपयोग होत नाही हे मायावती आणि अखिलेश यादव यांच्या लक्षात आल्याने आपल्या पारंपारिक मतपेटी बरोबरच ब्राह्मण मतांची बेगमी करण्याच्या पाठीमागे हे दोन्ही नेते लागले आहेत. उत्तर प्रदेशात 13 टक्के ब्राह्मण आहेत. त्यापैकी काही मते जरी आपल्या कडे वळली तरी आपल्या पारंपरिक मतपेढी वाढ होऊन सत्तेचा मार्ग मोकळा होतो असा मायावती आणि अखिलेश यादव यांचा परस्पर विरोधी राजकीय होरा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App