विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा : कोरोना विषाणूचा उगम प्रयोगशाळेत झाल्याच्या निष्कर्ष चीनने फेटाळला आहे. कोरोनाच्याा साथीत जगभरात लाखो लोकांचा जीव गेला, तरी या विषाणूची उत्पत्ती कोठून झाली, हे समजू शकलेले नाही. यासाठी दुसऱ्यांदा चौकशी करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्लूएचओ) प्रस्ताव चीनने गुरुवारी धुडकावला.China has denied that the corona virus originated in a laboratory
अमेरिका व अन्य देशांकडून चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या प्रयोगशाळेची चौकशी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. अमेरिकेच्याप परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री वेंडी शरमन या येत्या रविवारी (ता.२५) चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष टेड्रॉस अधोनोम घेब्रेयसूस यांनी गेल्या आठवड्यात कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपासाचा दुसऱ्या टप्पा सुरू करण्याचा विचार व्यक्त केला होता.
कोरोनाची जागतिक साथ आणि त्याचा प्रयोगशाळेतील उगमाची शक्यता फेटाळणे हे घाई करण्यासारखे ठरेल. शास्त्रज्ञ कोरोनाचे मूळ शोधत असल्याने चीनची भूमिका पारदर्शक असावी, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App