विशेष प्रतिनिधी
मुंबई :जलयुक्त शिवार योजनेत काही चुका झाल्या असतील तर त्यांची खुशाल चौकशी करा. आम्हाला कोणतीही अडचण नाही असे आव्हान े विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.Inquire about the work of Jalayukta Shivar Yojana,, Devendra Fadnavis Challenges Mahavikas Aghadi,
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या ९२४ कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या योजनेतील कथित गैरकारभाराची चौकशी करणाऱ्या विजय कुमार समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ९२४ प्रकरणांची एसीबी चौकशी करणार आणि ३९६ प्रकरणांची विभागीय चौकशी करणार असे मी ऐकतोय. आमच्या काळात आलेल्या साडेसहाशे तक्रारींची चौकशी करण्याची भूमिका आम्ही घेतलेली होती. या योजनेंतर्गत साडेसहा लाख कामे झाली.
त्यातील हजारभर प्रकरणांची चौकशी होणार असेल तर ती नक्की करावी. या योजनेत सर्व अधिकार हे जिल्हाधिकारी पातळीवर विकेंद्रीत केलेले होते. चौकशीला आमचा आक्षेप नाही.दरम्यान जलयुक्त शिवार योजनेतील चौकशीचे लेखी आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पाठविण्यात आले आहेत.
महालेखापालांनी (कॅग) एकूण ११२८ प्रकरणांची तपासणी केली होती. त्यात अनियमितता आढळलेल्या सर्व ९२४ कामांची एसीबीमार्फत चौकशी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. समितीनेदेखील तशी शिफारस केलेली होती.
याशिवाय थेट समितीकडेदेखील काही तक्रारी आलेल्या होत्या. त्यापैकी ३९६ प्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ४७२ प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी करण्याची गरज नाही, असे समितीने शिफारशीत म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App