विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या ३ते ४ दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घटना घडत आहेत. त्यातच कल्याण मधील वालाधुनी परिसरात पावसामुळे ८ ते १० फूट पाणी घरात भरले आहे.Rain Water is the houseas of Kalyan Area; Five Hundred person’s rescued, Ulhas River Overflow
या पाण्यामुळे परिसरात राहणारे नागरिक अडकले होते. अशा ५०० हुन अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढले आहे.कल्याणच्या वालधुनी परिसरात आज पहाटे ४ च्या सुमारास नदी पात्राच्या पाण्यात वाढ झाल्याने घरात ८ ते १० फूट पाणी भरले. कल्याणमध्ये पावसाचा जोर कमी झाला.
परंतु समुद्राच्या भरतीमुळे नदी पात्राचे पाण्याची पात्रता कमी न झाल्याने अनेक नागरिक हे घरांमध्ये अडकले होते. अशा ५०० हून अधिक नागरिकांना कल्याणच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App