विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूत नजिबुल्ला अलीखिल यांच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनेनंतर अफगाणिस्तान सरकारने राजदूताला आणि इतर वरीष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधून माघारी बोलाविले आहे.Afghan ambassador will come back from Pakistan
अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिलेली ही सणसणीत चपराक असल्याचे मानले जाते. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अलीखिल यांच्या मुलीचे इस्लामाबाद येथून अपहरण झाले होते.
मानसिक छळ करून आणि जखमी करून तिला नंतर सोडून देण्यात आले होते. यावर अफगाणिस्तान सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. काल (ता. १८) त्यांनी नजिबुल्ला आणि इतर काही वरीष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी माघारी बोलावून घेतले.हा निर्णय चुकीचा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
या प्रकरणाचा शोध सुरु असून अलीखिल यांच्या मुलीच्या मदतीने हल्लेखोरांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राजदूतांची सुरक्षा वाढविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, तरीही अफगाणिस्तान सरकारने राजदूताला माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App