दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदून काढण्याचे भारताला सामर्थ्य: युनोच्या तीन समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची दोन वर्षासाठी नियुक्ती नुकतीच केली असून टी.एस. तिरुमूर्ती हे भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून तेथे काम करणार आहेत. India will be chairing 3 key subsidiary bodies of UN Security Council


विशेष प्रतिनिधी

नूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रमुख तीन दहशतवादविरोधी समित्यांचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे तालिबानी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदून काढण्याचे सामर्थ्य भारताला या माध्यमातून प्राप्त झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची दोन वर्षासाठी नियुक्ती नुकतीच केली असून टी.एस. तिरुमूर्ती हे भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून तेथे काम करणार आहेत.परिषदेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात भारताला तीन समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तालिबान निर्बंध समिती, दहशतवादविरोधी समिती (२०२२ साठी) आणि लिबिया निर्बंध समिती, अशा तीन समित्यांचे भारताला अध्यक्षपद मिळाले आहे.

अफगाणिस्तानची शांतता, सुरक्षा, विकास आणि प्रगती याविषयी भारत आग्रही आहे. त्यामुळे तालिबान निर्बंध समितीसाठी भारताने उच्च प्राथमिकता दिली आहे.

२०२२ मध्ये भारत दहशतवादविरोधी समितीचा भारत अध्यक्ष असेल. या समितीच्या अध्यक्षतेखाली दहशतवादाची पाळेमुळे खोदून काढण्याचे सामर्थ भारताला प्राप्त होणार आहे. सीमापार दहशतवादाशी लढा देण्यात भारत अग्रणी राहिला असून तो या दहशतवादाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे.

India will be chairing 3 key subsidiary bodies of UN Security Council

लिबियातील शांती प्रक्रियेवर आंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित केले जात आहे. तेव्हा आम्ही गंभीर टप्प्यावर लिबिया निर्बंध समितीचे अध्यक्षपद स्वीकारत असल्याचे टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*