डाळींच्या साठा मर्यादेतून आयातदारांना सवलत, दर कमी होत असताना शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी केंद्राचा निर्णय

Importers of pulses exempted from stock limits Move to benefit farmers when prices showing a declining trend
  • घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 500 मेट्रिक टन
  • गिरणी मालकांसाठी साठा मर्यादा 6 महिन्यांचे उत्पन्न किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 50%, यापैकी जे अधिक असेल ते
  • किरकोळ विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 5 मेट्रिक टन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डाळींच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत व्हावी, यासाठी आज केंद्राने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. किंमती कमी करण्याबाबत विचार केल्यानंतर आणि राज्य सरकारे आणि विविध भागधारकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर केंद्र सरकारने गिरणी मालक आणि घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा शिथिल केली आहे. आयातदारांना यातून सूट दिली आहे. या घटकांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या वेब पोर्टलवर साठा जाहीर करणे सुरू ठेवायचे आहे. ही साठा मर्यादा केवळ तूर, उडीद, हरभरा आणि मसूरसाठी लागू असेल. Importers of pulses exempted from stock limits Move to benefit farmers when prices showing a declining trend

सुधारित आदेशानुसार, हा साठा केवळ तूर, मसूर, उडीद आणि हरभरा यावर 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत लागू असेल. साठा करण्याच्या मर्यादेतून डाळींच्या आयातदारांना सवलत देण्यात येईल आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर (fcainfoweb.nic.in) डाळींचा साठा घोषित करणे सुरूच ठेवावे लागेल.

घाऊक विक्रेत्यांसाठी साठा करण्याची मर्यादा 500 मेट्रिक टन असेल (एका जातीच्या धान्यासाठी ती 200 मेट्रिक टनपेक्षा जास्त नसावी); किरकोळ विक्रेत्यांसाठी साठा करण्याची मर्यादा 5 मेट्रिक टन असेल आणि गिरणी मालकांसाठी साठा करण्याची मर्यादा 6 महिन्यांच्या उत्पादनासाठी किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 50% , जे काही अधिक असेल, ते लागू केले जाईल. गिरणी मालकांसाठी ही सवलत तूर आणि उडदाच्या खरीप पेरणीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मदत करेल.

Importers of pulses exempted from stock limits Move to benefit farmers when prices showing a declining trend

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात