नाशिक – राष्ट्रपतीपदाच्या वावड्या ते केंद्र सरकारचे कृषी कायद्यांसाठी “मध्यस्थ” असा “नवा राजकीय रोल” मराठी राजकीय विश्लेषकांनी राज्यसभेचे खासदार शरद पवारांना आज देऊन टाकला आहे. Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest
मराठी विश्लेषकांनी शरद पवारांचे विश्लेषण नेहमीच lager than his political clout असे केले आहे. त्यामुळे आजच्या मोदी – पवार भेटीनंतरही तसेच चाललेले दिसत आहे. राज्यसभेचे नवनियुक्त नेते पियूष गोयल यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये एक भेट शरद पवारांची होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शरद पवारांची देखील माजी संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भेट घेतली. LAC भारत – चीन सीमातंट्याबाबत राहुल गांधी अधून मधून काही वावड्या उडवत असतात, त्या किमान देशहितासाठी तरी रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. पण या तिघांच्या भेटीतून हे साध्यच होईल, ही शक्यता नाही. कारण राहुल गांधी यांच्यावर या तिघांपैकी कोणाचाच कंट्रोल नाही. तरीही अँटनी यांना घेऊन शरद पवार हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे गेले. अँटनींना घेऊन येण्यास राजनाथ सिंग यांनी पवारांना सांगितले. अशा बातम्या चालविल्या गेल्यात. यात सत्य किती, हे कुणालाच माहिती नाही. हे तीनही नेते या भेटीतले सत्य कुणाला सांगण्याची शक्यता नाही.
जे पियूष गोयलांच्या आणि राजनाथ सिंग यांच्या पवारभेटीचे, तसेच पवारांनी मोदींना जाऊन भेटण्याचे गुपित म्हणता येईल. पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधान कार्यालयाने PMO अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्यसभेचे खासदार शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना येऊन भेटल्याचे ट्विट केले आहे. PMO च्या दृष्टीने शरद पवार हे राज्यसभेच्या अनेक खासदारांपैकी एक खासदार आहेत. मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या भेटीचे ट्विट देखील केलेले नाही.
उलट शरद पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या भेटीची माहिती दिली आहे. आदरणीय पंतप्रधानांना भेटलो आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली असे ट्विट पवारांनी केले आहे.
पण मराठी विश्लेषक पत्रकारांनी शरद पवारांना कृषी कायद्यांवरच्या मध्यस्थाचा रोल परस्पर देऊन टाकला आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे आंदोलन हा विषय थांबवायचा आहे म्हणून पवारांनी मध्यस्थी करावी, असे केंद्र सरकारला वाटते, असा नवा सिध्दांत मराठी राजकीय विश्लेषकांनी मांडला आहे. ज्या भाजपचे संसदेत ४२५ च्या आसपास खासदार आहेत, त्या पक्षाच्या नेतृत्वाला ७ खासदारांच्या नेत्याची मध्यस्थी हवी आहे, असे मराठी राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यांनी ते विविध चॅनेलवरच्या चर्चांमध्ये आग्रहाने मांडले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नवे कृषी कायदे मांडण्यासाठी आग्रही आहे. त्याला पवारांनी खो घालावा, असे केंद्र सरकारला वाटते, असे मत देखील मराठी विश्लेषकांनी मांडले आहे. जणू काँग्रेस महाराष्ट्र विधानसभेत मांडणार असलेले संभाव्य कृषी कायदे पासच होणार आहेत, असा मराठी राजकीय “विश्लेषकांचा जबरदस्त” होरा आहे.
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
ED च्या कारवाईची पण चर्चा
ऱाष्ट्रवादीचे एका पाठोपाठ एक मंत्री गाळात चाललेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खाते सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिखर बँक घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्यांमध्ये पवारांसह अनेकांच्या माना अडकलेल्या आहेत. पवारांनी नेमलेले गृहमंत्री अनिल देशमुखांची संपत्ती जप्त करण्यापर्यंत ED ची मजल गेली आहे. अजित पवारांच्या मामांच्या घरच्या कंपनीचा साखर कारखाना जप्त करण्यापर्यंत ED ची कारवाई येऊन ठेपली आहे. अजून ९ कारखाने जे पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित आहेत, त्या कारखान्यांपर्यंत ED चे हात केव्हाही पोहोचू शकतात, अशी अवस्था आहे. जी अवस्था राष्ट्रवादीची आहे, तीच अवस्था शिवसेनेच्या नेत्यांची आहे. अनिल परबांचे नाव ED च्या रडारवर आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मोदींच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोदींची गेल्या महिन्यात एकांतात भेट घेतली. त्यानंतर पवारांनी आज तासभर भेट घेतली आहे, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App