
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चक्क गाडीच्या सायलेन्सर चोरून त्यातील प्लॅटिनम धातू काढून विकणारी टोळी कळवा पोलिसांनी गजाआड केली. ही टोळी फक्त मारुती सुझुकी कंपनीच्या ईको गाडीचे सायलेन्सर चोरत होती, असे तपासात उघड झाले होते.stealing silencer gang Caught ; They are selling Platinum which was recovered from silencer
गाडीच्या सायलेन्सरमध्ये एका पोकळीत दोन्ही बाजूला लावलेल्या जाळ्यात मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो. हा धातू मातीतून शोधून आणि तो वितळवून बाजारात विकण्याचे काम ही टोळी करत होती. या टोळीला अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली आहे.
- सायलेन्सर चोरून प्लॅटिनम काढण्याचे प्रकार
- काळवा पोलिसांनी टोळी पकडली
- मारुती सुझुकीच्या ईको गाडीवर डोळा
- सायलेन्सर-मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो
- प्लॅटिनम धातू काढून तो विकण्याचा धंदा
- आरोपीना चार दिवसांची पोलिस कोठडी