वृत्तसंस्था
नवी दिल्ली – आधी ममता बॅनर्जी, मग शरद पवार आणि थेट राहुल गांधी. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रशांत किशोर आज दुपारी वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. Poll strategist Prashant Kishor meets Congress leader Rahul Gandhi at his residence in Delhi.
सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात वरपासून खालपर्यंत सर्वच स्तरांवर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांना काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
या राजकीय पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांची घरी जाऊन भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. प्रशांत किशोर २०२४ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षांमधून प्रबळ पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांमध्ये त्यांनी आधी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना गुंफून घेतले आहे. ममता आणि पवार यांच्याशी त्यांनी उत्तर राजकीय संपर्क प्रस्थापित केल्यानंतर आज ते राहुल गांधी यांची भेट घेत आहेत.
अर्थात यामध्ये फक्त राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या लोकसभेतल्या नेतेपदाबाबत चर्चा होते की ही चर्चा संसदीय दलाच्या नेतेपदापर्यंत पुढे जाते तसेच पंतप्रधान पदाच्या उमेदवारीपर्यंत पुढे जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
शिवाय उत्तर प्रदेशातही निवडणूक आहे. तेथे प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणावे, अशी सूचना काँग्रेसमधूनच सलमान खुर्शीद आणि अन्य नेत्यांनी केली आहे. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात सक्रीय देखील झाल्या आहेत. या विषयावर प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली आहे का हे पाहणेही तितकेच रंजक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App