विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: कट्टर दहशतवादी असलेल्या सलाहुद्दीनच्या मुलांचा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना कळवळा आला आहे. मुलांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना कशी देता ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.Mehbooba Mufti expressed sympathy for the children of the terrorists and expressed displeasure over their removal from government service
सरकारने हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकले आहे. त्यांच्यावर सरकारी नोकरी करत असताना दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
यावर बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, कुठल्याही तपासाशिवाय सलाहुद्दीनच्या मुलांवर ही कारवाई करण्यात आली आहे. वडिलाने केलेल्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का देता ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान महबूबा यांनी कलम 370 आणि 15अ चाही उल्लेख केला. या प्रकरणाचा संबंध अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याशी जोडत त्या म्हणाल्या, जेव्हा राम मंदिराचे प्रकरण कोर्टात होते, तेव्हा यासाठी लोक आवाज उठवायचे. मग मी कलम 370 साठी आवाज उठवल्यावर गुन्हेगार का ठरवताय 370 आणि 35अ परत आणण्यासाठी नेशनल कॉन्फ्रेंस आणि पीडीपीसोबत इतर पक्ष आल्याचेही त्या म्हणाल्या.
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसुफला एनआयएने राजधानी दिल्लीतून अटक केली होती. सय्यदला 2011 मधील एका दहशतवादी संघटनेला फंडिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एनआयएने 2011 मधील एका प्रकरणाच्या सय्यद शाहिद युसुफला चौकशीसाठी बोलावले होते.
सय्यद सलाउद्दीन हा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. भारताविरोधात गरळ ओकणाºया सय्यदच्या संघटनेने काश्मीरसह संपूर्ण देशभरात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App