विशेष प्रतिनिधी
मुंबई: दुकानांच्या वेळांवरून धरसोड होत असल्याने मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर संतप्त झाले आहेत. दुकानांच्या वेळा वाढवून व्यापारावरील निर्बंध शिथिल केले नाहीत तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.Merchants angry at Thackeray government, if not extended shop hours, but warning of boycott of elections
दादरमध्ये सोमवारी व्यापाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. व्यापारी म्हणाले, मुंबईत बेस्टच्या एका बसमध्ये एकाचवेळी 50 ते 60 प्रवासी प्रवास करतात.
तेव्हा कोरोनाचा प्रसार होत नसेल तर आमच्या दुकानातील पाच-सहा लोकांमुळेच कोरोना कसा काय पसरतो. गेल्या वर्षभरापासून व्यापारी केवळ खर्च करत आहेत. त्यांना कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही. परिणामी सध्या बहुतांश व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आताही उत्पन्न मिळाले नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल
खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. डोंबिवली आणि कल्याणहून मुंबईत खासगी वाहनाने यायचे असेल तर लोकांना साधारण 700 रुपये मोजावे लागतात.
मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी आणि लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे दरेकर यांनी म्हटले. प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्रही पाठवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App