प्रतिनिधी
मुंबई : लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात स्वबळाची राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्यावर पाळत ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या आरोपांपासून माघार घेतली आहे. त्याचवेळी त्यांनी तो आरोप केंद्रावर ढकलला आहे.Nana patole backtracks from his alligation against CM uddhav thackeray
राजकीय नेते नेहमीच आपण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेताना जे वक्तव्य करतात, नेमके तेच वक्तव्य नानांनी केले आहे, ते म्हणाले की मीडियाने माझ्या भाषणाचा विपर्यास केला. नाना आपल्या भाषणाचे खापर मीडियावर फोडून मोकळे झालेत.
नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास लावण्यात आला असल्याचा मीडियावरच आरोप लावला आहे. लोणावळ्यातल्या माझ्या भाषणातले आरोप राज्य सरकारवर नव्हते तर केंद्र सरकारवर होते असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पाळत ठेवण्याबाबत माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नाही. मुंबईत आल्यावर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असे नाना पटोले यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीला सांगितले.
नाना पटोले यांनी परवा लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले होते. ते म्हणाले होते, की महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा उभी राहात असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो.
कुठे बैठका, आंदोलन सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा झाली हे अन्य कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असे नाना पटोले म्हणाले होते.
स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार. फोन टॅपिंगबद्दल मी बोललो. पण माझ्यावर राज्य सरकारची देखील पाळत आहे, असाही आरोप त्यावेळी नानांनी केला होता. नानांचे हेच भाषण सोशल मीडियावरून फिरवले गेले. पण त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली. त्यामुळे नानांना वरील खुलासा करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App