विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिपसोबत आता आयुष प्रशिक्षणही घ्यावं लागणार आहे. यासंदभार्तील मसुदा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केला आहे. कम्पल्सरी रोटेटिंग इंटर्नशिप, २०२१ अंतर्गत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने एक आठवड्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.MBBS students are now required to undergo AYUSH training
हे प्रशिक्षण कार्डिओलॉजी, नेफ्रालॉजी, पल्मनरी मेडिसिन आणि मेडिकल आँकोलॉजी यांसह कोणत्याही दोन सुपर स्पेशालिटी शाखेतील असेल. विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये या प्रशिक्षणाचा समावेश राहील. वैद्यकीय पदवी अर्थात एमबीबीएस विद्यार्थ्यांना पदवीनंतर १२ महिन्यांच्या कालावधीत १७ पोस्टिंग असतात.
त्यापैकी १४ अनिवार्य आणि ३ पर्यायी असतात. वैकल्पिक प्रकारात इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि सुपर स्पेशालिटी शाखेचा समावेश असतो. आयुषसाठी विद्यार्थी आयुर्वेद, योग, युनानी, होमिओपॅथी आणि सिद्ध सोवा रिग्पा यापैकी एक पर्याय निवडू शकतात.
पालक प्रतिनिधी सुधा शेणॉय म्हणाले, इंटर्नशीप या सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या स्पेशालिटीतील असतात. या ट्रेनिंगमुळे त्यांच्या स्पेशालिटी ट्रेनिंगमधील कालावधी कमी होणार आहे.ही ट्रेनिंग आयुषसंबंधीच्या केवळ माहितीपुरतीच असावी, अशी अपेक्षा एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली. एनएमसीने विद्यार्थ्यांना त्यांची इंटर्नशीप ते ज्या संस्थेतून पदवी घेत आहेत, तिथूनच पूर्ण करण्याची शिफारसदेखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App