विशेष प्रतिनिधी
मुंबई – शिवसेनेत अंतर्गत खदखद टप्प्याटप्प्याने बाहेर येतेय. आता पक्षांतर्गत खदखद उत्तर महाराष्ट्रातून अर्थात जळगाव जिल्ह्यातून बाहेर आली आहे. शिवसेनेचे एरंडोल – पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी राज्यातले शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटलांचे जळगाव जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी तसेही पटत नाही. त्यांचे एकनाथ खडसेंशी देखील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. shiv sena MLA chimanrao patil targets shiv sena minister gulabrao patil in jalgaon
चिमणराव पाटलांनी आज पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले, की आपण शिवसेना पक्ष सोडून जावे यासाठी शिवसेनेतूनच काही जणांकडून त्रास दिला जात आहे. चिमणराव पाटील यांचा अंगुलीनिर्देश हा शिवसेनेचेच मंत्री गुलाबराव पाटलांवर असल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने खासदार संजय राऊत यांनी जून महिन्याच्या सुरूवातीला दौरा केला होता. त्यांचा दौऱ्यात सगळे आलबेल असल्याचे दाखविण्यात आले. पण दौरा संपल्यावर मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी थांबलेली नाही, हेच दिसून आले. त्यातूनच शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आज जाहीरपणे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, शिवसेनेत स्थानिक नेते मला विनाकारण त्रास देत आहेत. मी सेनेतून बाहेर पडावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे. शिवसेनेत अलीकडेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख दिला आहे. माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत मला साधी माहिती देखील देण्यात आली नाही, अशी खंत चिमणराव पाटलांनी व्यक्त केली.
शिवसेनेत डावलले गेल्याची भावना आमदार चिमणराव पाटलांनी उघडपणे व्यक्त केल्याने उत्तर महाराष्ट्रातील अस्वस्थ शिवसैनिकांचा त्यांना पाठिंबा मिळायला लागला आहे. नाशिकमध्ये शिवसेना नेत्यांचा राजकीय वाद छगन भुजबळांशी आहे. त्यांनी एकजूट दाखवून भुजबळांना लोकसभेत पाडले आहे. पण आता महाविकास आघाडीमुळे नाशिकच्या शिवसेना नेत्यांना भुजबळांशी जुळवून घेणे जड जाते आहे.
shiv sena MLA chimanrao patil targets shiv sena minister gulabrao patil in jalgaon
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App