
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाचे विकृतीकरण काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. यासाठी १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञ आपल्या ठोस सूचना इठग्रजी अथवा हिंदीमध्ये पाठवू शकतीलअसे केंद्र सरकारने म्हटले आहे.Steps of Central Government to remove distortion of history from school curriculum, suggestions sought from students, teachers, educators
राज्य सभेच्या सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की शिक्षण, महिला, बालक, युवक आणि क्रीडा विषयांच्या संसदीय समितीने शालेय अभ्यासक्रमाचे परीक्षण सुरू केले आहे. यानुसार शालेय अभ्यासक्रमातील आशय आणि आरखड्यावर चर्चा होणार आहे.
यामध्ये पुढील मुद्दे चर्चीले जाणार आहेत. शालेय पुस्तकांतून अनऐतिहासिक तथ्ये आणि आपल्या राष्ट्रपुरुषांचे विकृतीकरण काढून टाकणे. इतिहासातील सर्व टप्यांवरील समान आणि योग्य अभ्यासक्रमाची आखणी करणे.
भारतीय इतिहासातील रणरागिनींचा इतिहास मुलांना समजावून देणे. यामध्ये गार्गी, मैत्रेयी यासारख्या विदुषी आणि झाशीची राणी, राणी चनम्मा, चांद बिबी आणि झलकरी बाई यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणा आहे.
Steps of Central Government to remove distortion of history from school curriculum, suggestions sought from students, teachers, educators
महत्त्वाच्या बातम्या
- सामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन
- मराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली मराठा आरक्षणाबाबत पुर्नविचार याचिका
- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलचा विजय ; २१/० ने उडवला विरोधकांचा धुव्वा
- शिवसेनेकडे असलेल्या खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र