विशेष प्रतिनिधी
यवतमाळ: जिल्ह्यातील झरीजामणी ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. शिबला पार्डी या वळण रस्त्यावर रस्तारुंदीकरणामध्ये पुरातन दगडी कोरीव खांब सापडले आहेत. हे कोरीव दगडी खांब नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहेत. याविषयी तज्ञ अभ्यासकांकडून व पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे. या भागात प्राचीन काळी कोणते साम्राज्य होते किंवा आणखीन काय होते हे पाहणे गरजेचे आहे. Ancient carved stone pillars in Shibla Ghat
हा भाग आदिवासीबहुल भाग आहे. झरी तालुक्यापासून जवळ असलेल्या कायर येथे गोंड राजाच्या साम्राज्याचे अस्तित्व होते, असे बोलले जाते. कदाचित या भागापर्यंत गोंड राज्याचे साम्राज्य असावे येथे सापडण्यात आलेले कोरीव दगडी खांब राजवाड्याचे अवशेष आहे की आणखीन काय आहे याचे पुरातत्व विभागाकडून व तज्ञ व्यक्तीकडून संशोधन होणे गरजेचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App