प्रतिनिधी
नवी दिल्ली – विरोधकांचे अर्थात भाजपचे महाविकास आघाडी सरकारवरील हल्ले हे फुसके बार आहेत, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक सदनात आवाजी मतदानाने घेण्याची मागणी केली. ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांच्या गेलेल्या विकेटी आणि आणखी मंत्र्यांवर होणारे आरोप यावर संजय राऊतांनी एबीपी माझाला बाईट दिले. v
ते म्हणाले, की “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्यांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटून काय करायचे हे ठरवणार आहे.
एकीकडे संजय राऊतांनी विरोधकांच्या आरोपांना फुसके बार म्हटले आहे. त्याच वेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीत मतदान टाळून सदनात आवाजी मतगदानाने निवडणूक घेण्याच्या मागणीचेही समर्थन केले. ते म्हणाले, की सरकार जेव्हा ठाकरे – पवार सरकार सत्तेवर आले तेव्हा १७० चे बहुमत होते. दुर्दैवाने दोन आमदार आमचे कमी झाले आहेत. तरीही आमचा १७० चा आकडा कायम राहील, याची खात्री आहे. पूर्ण बहुमत असताना आवाजी मतदान झाले तरी त्यासाठी घटनात्मक तरतूद आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या निवडणुका सर्वत्र झाल्या आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आवाजी मतदानाचा आग्रह धरून संजय राऊतांनी एक प्रकारे महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतांच्या बेरजेची झाकली मूठ राहावी, अशीच भूमिका घेतलेली दिसते. कारण महाविकास आघाडीत आता बराच विसंवाद निर्माण झाला आहे. संजय राठोड आणि अनिल देशमुख या दोन मंत्र्यांच्या विकेटी गेल्या आहेत. अजित पवार, अनिल परब, नितीत राऊत हे मंत्री रांगेत असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App