Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता आधीच एकापेक्षा जास्त विवाह करण्याची एक व्यवस्था आधीपासूनच आहे आणि आता सरकारला महिलांसाठी असेच काही करायचे आहे. south africa government proposal of polandry started controversy
वृत्तसंस्था
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता आधीच एकापेक्षा जास्त विवाह करण्याची एक व्यवस्था आधीपासूनच आहे आणि आता सरकारला महिलांसाठी असेच काही करायचे आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या रूढीवादी संघटनांना या निर्णयाबद्दल राग आहे. सुप्रसिद्ध उद्योजक आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व मुसा मासेलेकू यांनी प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. हा प्रस्ताव कायद्यात रूपांतरित झाल्यास दक्षिण आफ्रिकेची संस्कृती संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मुसा या प्रकरणात म्हणाले की, स्त्रिया कधीही पुरुषांची जागा घेऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, हा कायदा संमत झाल्यानंतर महिला पुरुषांसाठी लोबोला घेतील का? आफ्रिकन संस्कृतीत लोबोला म्हणजे वधूची किंमत, त्यांना पुरुषांकडून पैसे दिले जातात. मुसांनी असाही प्रश्न विचारला की, अशा नात्यात मुलांची अवस्था काय असेल? ते म्हणाले की, जर पुरुषाने एकापेक्षा जास्त लग्न केले तर ती एक प्रचलित प्रथा आहे, परंतु जर स्त्रीने एकापेक्षा जास्त लग्न केले तर पुरुष हे सहन करू शकणार नाहीत, कारण ते खूप ईर्ष्यावान आहेत आणि समाज विस्कळीत होईल.
रिअॅलिटी टीव्ही स्टार मुसा यांना स्वत: चार बायका आहेत, परंतु स्त्रियांसाठी एकापेक्षा जास्त लग्नाच्या कायद्यात त्यांना अडचण वाटतेय. विशेष म्हणजे हा प्रस्ताव दक्षिण आफ्रिकेच्या गृह विभागाने दिला आहे आणि त्यास ग्रीन पेपरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘इंडिपेंडंट’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, आफ्रिकन ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते केनेथ मेसोहो असेही म्हणाले की, यामुळे समाज नष्ट होईल. यासंदर्भात प्राध्यापक कोलिस मेकोको यांचे विधानही अत्यंत रंजक होते. ते म्हणाले की, आफ्रिकन समाज खर्या अर्थाने समानतेसाठी तयार नाही. ज्या महिलांवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्याशी कसे वागावे हे आम्हाला माहिती नाही.
महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या शेजारच्या झिम्बाब्वेमध्ये महिलांमध्ये एकापेक्षा जास्त पती असण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. प्रोफेसर कॉलिन्स यांनीही यावर संशोधन केले आहे. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, अशा प्रकारचे विवाह सहसा स्त्रियाच करतात. दक्षिण आफ्रिकेची घटना ही जगातील सर्वात पुरोगामी घटना आहे. समलिंगी विवाहदेखील येथे मान्यत पावलेला आहे आणि ट्रान्सजेंडर्सनादेखील संपूर्ण हक्क मिळतात.
south africa government proposal of polandry started controversy
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App