वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती दिली आहे. Educational institutes will Not charge any Fee’s From the Student’s whose parents are Died Due to Coronavirus : Uday samant
उदय सामंत यांची राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत शुल्काबाबत दुपारी चार वाजता बैठक झाली. सुमारे एक तास ही बैठक झाली.
ट्युशन फी वगळता इतर विद्यापीठ शुल्क जसे की ग्रंथालय, कम्प्युटर लॅब, जिमखाना हे बंद असताना या गोष्टींची फी कमी करता येईल का? याबाबत चर्चा विद्यापीठ कुलगुरूसोबत या बैठकीत करण्यात आली. कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे विद्यापीठाच्या शुल्कामध्ये कपात होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
दोनच दिवसापूर्वी कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला होता. परीक्षा शुल्क माफ करावे किंवा फीमध्ये कपात करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App