सर्व आस्थापनांनी १० जुलैपूर्वी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे आदेश गुजरात सरकारने दिले आहे. हा आदेश पाळला नाही तर बंदीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.Vaccinate all employees with by July 10, Gujarat government orders to industries and establishments
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : सर्व आस्थापनांनी १० जुलैपूर्वी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे आदेश गुजरात सरकारने दिले आहे. हा आदेश पाळला नाही तर बंदीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हा आदेश काढला आहे. गुजरातमधील १८ शहरांमध्ये सध्या रात्रीची संचारबंदी आहे. या शहरांमधील सर्व आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे ३० जूनपर्यंत लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच व्यवस्थापक आणि मालकांचाही समावेश आहे.
उर्वरित राज्यात १० जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास मुदत देण्यात आली आहे. सरकारच्या माहिती विभागाने काढलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे मुदतीत लसीकरण केले नाही तर त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात येईल.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी कोअर कमीटीची बैठक घेतली. यावेळी राज्यातील ३६ पैकी १८ शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी वाढविण्यात आली. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. राजकोट, अहमदाबाद, गांधीधाम, गांधीनगर, जामनगर, सुरत, भडोच, भुज, मोरबी, वडोदरा, मेहसाना, वापी, अंकलेश्वर, जुनागड, पाटण, भावनगर, नवसारी आणि बलसाड या शहरांमध्ये संचारबंदीची मुदत वाढविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App