Dhule Farmer : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली, परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभ ठाकलं… दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढविली. शिरपूर तालुक्यात जून महिना अर्ध्यावर उलटला असला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी करूनदेखील शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली आहे. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई येथील विनेश पावरा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. परंतु विनेश पावरा या तरुण शेतकऱ्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये कपाशी पेरल्यानंतर कपाशीचे कोंबदेखील बाहेर आले होते. पावरा यांनी प्रत्येक कपाशीच्या रोपाजवळ जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून, त्या पिशवीला बारीक छेद करत पाण्याची व्यवस्था केली. यातून रोपं तग धरतील एवढे पाणी थेंबाथेंबाने पडते आहे. पावसाने दडी मारल्यानंतर तब्बल आठ दिवस हा प्रयोग यशस्वी ठरला. पिशवीमधून मिळणाऱ्या थेंब-थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बीमधून निघालेले कोंब काही इंच मोठेदेखील झाले. त्यानंतर अचानक काल व आज पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाचे पाणीदेखील पिकास मिळाल्याने त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. पावसाचे पाणी पिकाला मिळू लागल्यामुळे त्यांनी ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या शेतातून आता काढून टाकल्या आहेत. तूर्तास तरी दुबार पेरणीचे संकट टळलं असलं तरी यापुढे पीक टिकविण्यासाठी समाधानकारक पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. WATCH Dhule Farmer Uses Plastic Bags Of Water To Irrigate Cotton Crop
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App