ट्विटरची खोडी : भारताच्या कायदामंत्र्याचे ट्विटर अमेरिकी कायद्याने ब्लॉक; पण रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरूनच बजावले; भारतीय कायदा पाळलाच पाहिजे!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेला नवा आयटी कायदा पाळण्याबाबत ट्विटर हयगय करीत असताना वादात आज ट्विटर कंपनीने नवीन भर घातली. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अकाऊंटचा ऍक्सेस ट्विटरने तासभर काढून घेतला. हा प्रकार काय हे लक्षात घेऊन रविशंकर प्रसाद यांनी koo ऍपवरून एकापाठोपाठ एक पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आणि काहीही केले तरी भारतीय कायदे ट्विटर कंपनीला पाळावेच लागतील, असा इशारा देखील दिला. Twitter denies Ravi Shankar Prasad access to his own account for an hour, minister says new IT rules will have to be followed

भारतीय आयटी कायद्यातील काही कलमे ट्विटर पाळत नसल्याचे लक्षात आल्याने ट्विटरला केंद्र सरकारने काही स्पष्टीकरणे मागितली आहेत. रविशंकर प्रसाद यांनी सर्व कंपन्यांना या संबंधीचे इशारे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर अकांऊटचा ऍक्सेस तासभर काढून घेतला. अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचा संबंधित अकाऊंटकडून भंग होत असल्याचे कारण ट्विटरने यासाठी दिले.

पण नंतर ट्विटर अकाऊंटवरच याबाबतची नोटीस देऊन कंपनीने रविशंकर प्रसादांचे अकाऊंट पुन्हा सुरू केले. परंतु, दरम्यानच्या काळात रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून एका पाठोपाठ एक पोस्ट करून ट्विटरच्या कारवाईला अनुचित ठरविले आणि ट्विटरने काहीही केले तरी त्यांना भारताचा नवा आयटी कायदा पाळावाच लागेल, असा इशारा दिला. ट्विटर स्वतःला अविष्कार स्वातंत्र्याचे अग्रदूत समजत असले, तरी ते तसे नाहीत. त्यांना त्यांचा अजेंडा भारतात चालवायचा आहे. फक्त स्वतःचा व्यावसायिक फायदा बघणाऱ्या कंपन्यांनी भारताला अविष्कार स्वातंत्र्यांचे लेक्चर देऊ नये, अशी टीकाही रविशंकर प्रसाद यांनी केली.

पण ट्विटरच्या या डिजिटल दादागिरीला रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून उत्तर दिल्याने सोशल मीडियात याची चर्चा चांगलीच रंगली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय टीव्ही चॅनेलने किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मी वापरलेल्या कंटेटच्या कॉपीराईटबद्दल विचारणा केलेली नाही, याकडेही रविशंकर प्रसादांनी koo ऍपवरून लक्ष वेधले.

Twitter denies Ravi Shankar Prasad access to his own account for an hour, minister says new IT rules will have to be followed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात