वृत्तसंस्था
पुणे : रिफ्लेक्टरवरून पुणे आरटीओ कार्यालयात रोज नवे वाद होत आहेत. पण, ज्या रिक्षांना या पूर्वी लावलेले रेडियम टेप (रिफ्लेकटर) जर योग्य स्थितीत असतील, तर त्यांना पासिंगसाठी नवे रिफ्लेकटर लावण्याची गरज नाही. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी आदेश दिला आहे. गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला. Dispute over reflectors of rickshaws in Pune ends; Even if it is in good condition, it will still be ok
रिफ्लेक्टरसाठी पूर्वी रिक्षाचालकांना केवळ शंभर ते दीडशे रुपये खर्च येत असताना आता त्यांना ८०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांत असंतोष निर्माण झाला होता. याबाबत रिक्षा संघटनानी आंदोलन केले होते. गुरुवारी सासवडच्या टेस्ट ट्रॅकवर अशा व जवळपास ४६ रिक्षाचे पासिंग करण्यात आले. मात्र, ज्या रिक्षा नवीन आहेत तसेच जुन्या रिक्षावर वरील पूर्वीचे रिफ्लेकटर योग्य स्थितीत नसतील अशा रिक्षांना नवे रिफ्लेकटर लावावे लागतील.
त्या शिवाय रिक्षाचे पासिंग होणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले. रिक्षांना २० एमएमचे टेप योग्य असताना विनाकारण ५० एमएमचे घेण्याची सक्ती होत आहे. यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्याबाबत आमचा लढा सुरूच आहे, अशी माहिती आम आदमी रिक्षा संघटना सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App