विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दुसऱ्या लाटेची सुरवातच महाराष्ट्र, छत्तीसगडसारख्या कॉंग्रेस शासित राज्यांतून झाली आणि हीच राज्ये लाट पसरण्यास जबाबदार आहेत व लसीकरणातही कॉंग्रेसशासित राज्यांमध्येच प्रचंड गोंधळ चालू आहे, असा आरोप भाजपने केला आहे.BJP lashes on congress
भाजप प्रवक्ते संबीत पात्रा म्हणाले, की लसीकरणाचे विकेंद्रीकरण करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी आता केली आहे. हेच राहुल गांधी यापूर्वी बरोबर उलटी मागणी करत होते. योगदिनाच्या निमित्ताने भारतात एका दिवसात ८७ लाख लोकांचे लसीकरण झाले व हा विश्वगविक्रम झाला.
कोरोनाची लढाई जेव्हा जेव्हा निर्णायक वळणावर असते व देशाला काही यश मिळते तेव्हा राहुल गांधी राजकारण सुरू करतात.ते म्हणाले, कॉंग्रेस शासित राज्यांतूनच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, याच राज्यांत सर्वाधिक मृत्यू झाले, याच राज्यांत लसीकरणात हाहा:कार उडाला आहे,
महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडसारख्या राज्यांत लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. राजस्थानसारख्या कॉंग्रेस शासित राज्यानेच केंद्राने दिलेल्या लसी परत पाठविल्याकडे गांधी यांनी आधी लक्ष द्यावे व मग तिसऱ्या लाटेचा इशारा द्यावा व लसीकरणावरून केंद्रावर टीका करावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App