केरळमध्ये डाव्या आणि काँग्रेस आघाडी यांच्या टकरीत भाजपनेही बरोबरीचा आवाज टाकला!!

  • मंदिरांच्या प्रशासनात सरकारचा हस्तक्षेप नको; शबरीमलाच्या भक्तांवर सीपीएम केडरने पोलिसांच्या वेशात अत्याचार केला;  केरळमध्ये अमित शहांचा झंझावात
  • श्रीधरन यांच्यासमवेत मलामपुळात रोड शो; कंजीरापल्ली, चथ्थन्नूर आदी ठिकाणी जाहीरसभा  

वृत्तसंस्था

तिरूअनंतरपूरम – केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज केरळच्या दौऱ्यात भाजपच्या प्रचारात जोरदार जान फुंकली. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इ. श्रीधरन यांच्या पल्लकड मतदारसंघात त्यांनी मलामपुळात जोरदार रोड शो केला. तर कंजरीपल्ली, चथ्थन्नूर आदी ठिकाणी मोठ्या प्रचार सभांना संबोधित केले.Kerala: Union Home Minister and BJP leader Amit Shah and E Sreedharan, party’s candidate from Palakkad campaign in Malampuzha

आत्तापर्यंतच्या निवडणूकांमध्ये भाजपचा प्रचार आणि त्याला जनतेचा मिळणारा प्रतिसाद नेहमी काँग्रेस आणि डाव्या आघाड्यांच्या तुलनेत नगण्य असायचा पण २०२१ च्या निवडणूकीतला फरक हा आहे, प्रचारात भाजप संपूर्ण राज्यात काँग्रेस आघाडी आणि डावी आघाडी यांना तोडीस तोड ठरताना दिसतो आहे.

केरळ विधानसभेत सध्या फक्त १ आमदार असताना भाजपने प्रचारात प्रचंड ताकद लावली आहे. यात केंद्रीय नेत्यांच्या फौजेच्या बरोबरीने स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी देखील मोठ्या प्रमाणात उभी राहताना दिसते आहे.

अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्या रोड शो आणि जाहीर सभांच्या विडिओ आणि फोटोंवरून हे स्पष्ट होतेच आहे. त्याच बरोबर भाजपने तेथील चर्चेसबरोबर ज्या वाटाघाटी केल्या आहेत आणि लव्ह जिहादच्या मुद्द्याला ज्या प्रकारे उचलून धरले आहे, त्याचा परिणाम भाजपच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात दिसतो आहे.

कंजीरापल्ली, चथ्थन्नूर आदी ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये अमित शहांनी मंदिरांच्या व्यवस्थेचा मुद्दा उचलून धरला. मंदिर व्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप अजिबात नको. शबरीमलाच्या भक्तांवर डाव्या पक्षांच्या केडरने पोलीसांच्या वेशामध्ये येऊन अत्याचार केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

त्याचवेळी जे केरळ राज्य शिक्षणात अव्वल आणि पर्यटन क्षेत्रात अव्वल होते, ते राज्य आज देशभर गोल्ड स्कॅम आणि राजकीय हिंसाचारासाठी गाजत असल्याची टीकाही अमित शहा यांनी केली.

Kerala: Union Home Minister and BJP leader Amit Shah and E Sreedharan, party’s candidate from Palakkad campaign in Malampuzha

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*