वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय सैन्यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी रात्री उडालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले.Two more terrorists killed, taking the death toll to 3. Search underway
उत्तर काश्मीरच्या सोपोरच्या गुंड ब्रथ भागात रविवारी उशीरा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय लष्करानं या संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यानंतर सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
आयपीजी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं, लष्करचा म्होरक्या मुदासिर पंडित हा या चकमकीत ठार झाला . पंडित याने 3 पोलिस, दोन नगरसेवक आणि २ नागरिकांची हत्या केली. एकूण लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. मुदासिर याच्या नावावर १० लाख रुपयांचे बक्षिस होते.
नार्को टेरर मॉड्यूलचा पदार्फाश
जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी बारामुल्ला येथे नार्को टेरर मॉड्यूलचा पदार्फाश केला. १२ जणांना अटक केली. ११ पॅकेट हेरॉईन, शस्त्रे आणि काडतुसे तसेच रोकड जप्त केली. आरोपींकडून १० ग्रेनेड, चार पिस्तूल आणि मोठ्या संख्येने काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्याशिवाय ११ पॅकेट हेरॉईनचे, २१.५ लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयांचा चेकही जप्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App