ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. 26 जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.Pankaja Munde said, The fight for OBC reservation is not about votebank, but about BJP’s core principles, dignity and values.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा ‘व्होट बँकेचा’ नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. 26 जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने 26 जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकाºयांच्या बैठका घेतल्या.
मुंडे म्हणाल्या, संघर्ष ही आपली ताकद आहे. कोरोना महामारीनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मोठा विषय घेऊन आपण याची सुरवात करत आहोत. बहूजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसींच्या आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 जून या जन्मदिवशी आपण सामाजिक न्यायाची मागणी करत आहोत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा लढा कुठल्या व्होट बँकेसाठी नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. समाजातील वंचित वर्गच जर धोक्यात येत असेल तर राष्ट्र धोक्यात येते. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे.
सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण 26 जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेऊन शहर दणाणून सोडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App