राज्यातील काही प्रस्थापित मराठा घराण्यामुळे विस्थापित मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मूठभर नेत्यांमध्ये मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या विसंगतीमुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.Sadabhau Khot accused of being deprived of Maratha reservation due to some established Marathafamilies
विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यातील काही प्रस्थापित मराठा घराण्यामुळे विस्थापित मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मूठभर नेत्यांमध्ये मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या विसंगतीमुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणी आहेत. शेतकºयांच्या अडचणी सोडवण्यासाठी दौºयानंतर वेळ पडली तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे.
खोत म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. याच अस्वस्थतेमुळे सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असावं. भाजप-शिवसेनेची युती नैसर्गिक होती. राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे.
प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही. ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App