अंगावर येणाऱ्या चेंडूंवर षटकार ठोकणारा सचिन राजकारणातील चाणक्यांना पुरून उरेल, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला विश्वास


अंगावर येणाऱ्या चेंडूंवर षटकार ठोकणारा सचिन राजकारणातील चाणक्यांना पुरून उरेल, असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. सचिन तेंडूलकरची भूमिका आणि शेतकरी आंदोलनाची स्थिती या विषयावर त्यांनी लेख लिहिला आहे. Sachin Tendulkar to hit sixes on balls, Sadabhau Khot


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंगावर येणाऱ्या चेंडूंवर षटकार ठोकणारा सचिन राजकारणातील चाणक्यांना पुरून उरेल, असा विश्वास रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

सचिन तेंडूलकरची भूमिका आणि शेतकरी आंदोलनाची स्थिती या विषयावर त्यांनी लेख लिहिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवरून सचिनला सल्ला दिला होता. इतर क्षेत्राविषयी बोलताना सचिनने काळजी घ्यावी, असे पवार म्हणाले होते.त्याला उत्तर देताना खोत यांनी म्हटले आहे की, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लतादीदींनी या पॉपस्टार रिहानाला फटकारून योग्य तेच केले आहे. सचिन आम्ही भारतीय शेतकरी तुझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभे आहोत. कोणी काही ही म्हणू दे तू असाच या राष्ट्रविरोधी टोळीला फटकावत राहा. दिदी आपण गायलेल्या ए मेरे वतन के लोगो जो शहीद हुये उनकी जरा याद करो कुबार्नी… या अजरामर गाण्यापुढे अशा अनेक टिटव्यांची टिवटिव निष्प्राण होऊन पडते.

शेतकरी आंदोलनाबबात खोत यांनी म्हटले आहे की, काही दिवस शांततेने सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचे गालबोट लागले. कृषी कायद्याच्या विरोधात सुरुवातीला काहीसे प्रामाणिकपणे चाललंय असे वाटणारे आंदोलन दिवसागणिक दिशाहीन होत गेले. अनेक दिवस चाललेल्या चर्चेतून तीन कायद्यांबाबत सरकार सुधारणेची लवचिक भूमिका घेत असताना तथाकथित 60 हून अधिक शेतकरी नेते ताठर भूमिका घेवू लागले. यावरून या आंदोलनाच्या आड लपलेले राजकारण उघड झाले.

इंग्लिश गाणं गाणारी पॉप स्टार रिहाना हीचे या आंदोलनावरील ट्विटवजा भाष्य हा राजकारणाचाच एक भाग आहे. सुरुवातीला मला वाटले रिहाना ही कोणीतरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची अर्थशास्त्रज्ञ आहे की काय. बयेनं भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे म्हणजे निश्चितच तिच्याकडे शेतकरी प्रश्नाविषयी काही तरी भलेबुरे विचार असतील म्हणून मी माध्यम चाळली तर बया चक्क इंग्लिश गाणी गाणारी निघाली. गुगलबाबाने सांगितले की अर्धनग्न अवस्थेत गाणारी ही पॉप गायिका तब्बल 4400 कोटी ची मालकीण आहे. फोर्ब्ज मासिकाने जगातील 100 प्रभावशाली महिलात 2020 साली हिची निवड केली होती. फॅशन व्यवसायात हिचं बऱ्यापैकी नाव आहे.

आपल्या व्यस्त व्यवसायातून रिहानाला गाझीपूर सीमेवर बसलेला माझा शेतकरीभाऊ दिसला हे बघून क्षणभर मला तिचं कौतुक वाटले. पण प्रसार माध्यमांनी बातमी दिली की दिल्ली आंदोलनावर दोन शब्द बोलायला या बयेने 18 कोटी रुपये घेतले आहेत. शंका घ्यायला जागा आहे, असे खोत म्हणाले. कारण या आधी सामाजिक आंदोलनांवर तिने आपली बुद्धी पाजळल्याची उदाहरणे मला दिसली नाहीत. शेती तोट्यात गेल्याने कर्जबाजारी झालेल्या भारतातील लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या विषयी बोलायला या बयेची दातखीळ बसली होती की काय? अचानक भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या विटंबनेमुळे अवघा भारत व्यथित असताना आमच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य रिहानाने करावे या पाठीमागील षडयंत्र ओळखायला फार काही मेंदूला ताण द्यायची गरज नाही.

आंदोलनाच्या आडून देशात गोंधळ माजवणाºया लोकांनीच रिहानाला सुपारी दिली असणार. प्रजासत्ताक दिनीच्या दंगलीने दिल्ली आंदोलनाने सहानुभूती पूर्णपणे गमावली आहे. गोंधळ माजवणारे राजकीय लोक उघड्यावर पडले आहेत. त्यांच्या अब्रूची लक्तरे प्रसारमाध्यमांनी जगभर दाखवली आहेत. आपली गेलेली पत झाकण्यासाठी राजकीय मंडळींनी रिहानासारख्या नामक परदेशी ठिगळाची मदत घ्यावी हे अधिकच केविलवाणं दिसत आहे, असेही खोत यांनी म्हटले आहे.

खोत यांनी शोले या चित्रपटाचे उदाहरण देऊन म्हटले आहे की, शोले या गाजलेल्या चित्रपटातील मेहबूबा ओ मेहबूबा या गाण्याची दृश्ये बघितली आहेत काय? गब्बर सिंग या कुख्यात दरोडेखोराला एक टोळी चोरून शस्रे पुरवत असते पण पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी ही टोळी नाचगाण्याच्या काफील्याचा वेष धारण करून जंगलात जाऊन गब्बर सिंगला शस्त्रे पुरवते. या काफिल्यातही रिहानासारखी थिरकणारी नृत्यांगना आहे. गाणे संपल्यानंतर जय आणि वीरू दारूगोळा पेटवून देवून गब्बरसिंगची रसद तोडतात. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर दरोडा घालायला आलेल्या टोळीतील पैसे देऊन आणलेली नृत्यांगना या पलिकडे रिहानाला महत्त्व देण्याची गरज नाही.

Sachin Tendulkar to hit sixes on balls, Sadabhau Khot

NEW DELHI, DEC 1 (UNI):- Farmers blocking National Highway at Delhi Haryana Singhu border during their Delhi Chalo protest against farm laws on Tuesday.UNI PHOTO-AK11U

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था