वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात पुन्हा विकेंड कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज आणि उद्या म्हणजे शनिवारी, रविवारी केवळ अत्यावश्यक आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. In Pune Weekend Lockdown Is Declared
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार तसंच पुण्यातील परिस्थितीनुसार पुणे महापालिका क्षेत्रामध्ये विकेंडला कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला गेला.
पुणे पालिकेने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर माहिती दिली. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना बैठक होईल त्या नंतरच आणखी निर्बंध शिथील होणार का हे समजेल, असे सांगितले आहे.
सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
विकेंड भटकंतीला परवानगी नाही
पानशेत धरण ,खडकवासला धरण, जलाशय तसेच लोणावळा, खंडाळा,सिंहगडसह जिल्ह्यातील गड किल्ले येथे पावसाळी पर्यटनावर निर्बंध जारी असल्याने विकेंडला गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App