वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एखाद्याने बेकायदेशीर, चिथावणीखोर ट्विट केल तर त्याची जबाबदारी ट्विटरची असणार आहे. कारण ट्विटरने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ च्या अंतर्गत मिळालेला सुरक्षेचा अधिकार गमावला आहे. Twitter is now responsible for provocative, provocative, illegal tweets
केंद्र सरकारने ट्विटरला वैधानिक अधिकारी नियुक्त करावा, असे वारंवार सुचविले होते. त्यासाठी २५ मे पर्यंत मुदत दिली होती. कोरोना संकटामुळे अधिकारी नियुक्त करताना अडचणी आल्या होत्या.
आता कोणतेही वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाईल. ट्विटरनं वैधानिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीस उशीर केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
नव्या आयटी नियमांनुसार ट्विटरला वैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र लॉकडाऊन आणि इतर कारणं देत ट्विटरनं अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. ट्विटरनं सुरुवातीला काही नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्या सरकारकडून फेटाळल्या. ट्विटरनं नेमलेले अधिकारी बाहेरील कायदेशीर सल्लागार होते. ते कंपनीशी थेटपणे जोडलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारने कठोर कारवाई करत तुमचे ट्विट तुमची जबाबदारी असल्याचे सांगून दणका दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App