इस्राईलची सूत्रे नफ्ताली बेनेट यांच्याकडे, तब्बल बारा वर्षांनंतर नेतान्याहू सत्तेतून पायउतार

विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : इस्राईलमध्ये यामिना पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट (वय ४९) यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. संसदेत बेनेट यांच्या बाजूने ६० तर, माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात ५९ मते पडली.  Naftali benet became Istrayali PM

बेनेट हे माजी पंतप्रधान नेतान्याहू यांचे एकेकाळचे सहकारी होते. मात्र, बेंजामिन यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी त्यांनी विरोधकांशी हातमिळविणी केली. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला १२० पैकी फक्त ७ जागा मिळाल्या आहेत. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे त्यांचा पक्ष ‘किंगमेकर’ आणि ते ‘किंग’ ठरले.



त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्री असून त्यातील नऊ महिला आहेत. विविध मतांच्या लोकांचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे,’ असे बेनेट यांनी सांगितले. ते संसदेत मंत्रिमंडळ जाहीर करत असताना नेतान्याहू यांच्या पक्षाच्या सदस्यांनी वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘देशासमोरील अटीतटीच्या प्रसंगी ही जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. विद्वेषाचे राजकारण विसरून आणि निवडणूकांचे राजकारण टाळून देशासमोरी प्रश्नह सोडवू,’ असे आवाहन बेनेट यांनी आपल्या सहकाऱ्यांना केले. इस्राईलमधील सत्तांतरानंतर नफ्ताली बेनेट यांचे विविध देशांच्या नेत्यांनी अभिनंदन केले.

Naftali benet became Istrayali PM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात