वृत्तसंस्था
लखनौ : महिलेचं धर्मांतर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात तीन जणांना अटक केलीली आहे. ही महिला उत्तराखंडमधील असून पोलिसांनी तीन जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या वर्षी राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू केला होता. या अंर्तगत रविवारी केलेली ही पहिली कारवाई आहे. Ups Anti Conversion Law 3 Arrested Yogi Government Uttar Pradesh Police
उत्तर प्रदेशातील रामपूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक संसार सिंग म्हणाले ,धर्मांतर केलेली महिला मूळची उत्तराखंडची आहे. प्रलोभन देऊन तिचे शहाबाद गावात धर्मांतर केले.
महिलेच्या पतीचं निधन झाल्यानंतर आरोपीने तिला दुसऱ्या गावातून शहाबादमध्ये आणलं होतं. आरोपी रिक्षाचालक असून, महिलेच्या नवऱ्याचा मित्र आहे.
धर्मांतर विधीनंतर महिलेच्या एका मुलाची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा लागू झाला होता. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी धर्मांतरविरोधी अध्यादेश काढला. या कायद्यात आरोपीला एक ते पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असून, १५ हजारांपर्यंत दंड सुद्धा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App