विशेष प्रतिनिधी
ऑकलंड : फायझर कंपनीची लस आता गर्भवती महिलांना देण्याचा निर्णय न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या लशीमुळे अशा महिलांना आणि त्यांच्या पोटातील अर्भकाला कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. Fizer vaccine safe for pregnant womens
गर्भवती महिलांना लस दिल्याने शरीरात निर्माण होणारी प्रतिपिंडे बाळामध्येही, तसेच आईच्या दुधातही आढळून आल्याची काही उदाहरणे आढळून आल्याने महिलांच्या आणि त्यांच्या अपत्यांच्या आरोग्यासाठी लस देणे आवश्य क असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इतर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा गर्भवती महिलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे एका संशोधनातून पुढे आले होते. तसेच, जगभरात अनेक ठिकाणी गर्भवती महिलांना लस दिल्यानंतर कोणताही त्रास झाला नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानेही अशा महिलांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App