चीनी ड्रॅगनच्या महत्वाकांक्षांना रोखण्यासाठी अतिश्रीमंत देश आले एकत्र

वृत्तसंस्था

लंडन : कोरोना संसर्गाविरोधातील लढा बळकट करणे, पर्यावरणाची उद्दीष्ट्ये पूर्ण करणे आणि चीनच्या आर्थिक सत्तेला आळा घालणे या तीन निश्चरयांसह ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या जी-७ परिषदेचा समारोप झाला. G – 7 countries coming together against china

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी बडे नेते प्रत्यक्ष एकमेकांना भेटले. ब्रिटन, अमेरिका, इटली, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडा या सदस्य देशांनी जागतिक आव्हानांचा एकत्रित आणि समन्वय राखत सामना करण्याचा निर्णय घेतला.



चीनच्या वाढत्या आर्थिक वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद झाली होती आणि त्याचे प्रतिबिंब या बैठकीत पडलेच. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनशी स्पर्धा करण्यासाठी एक येण्याचे बायडेन यांनी आवाहन केले. पर्यावरण बदलाबाबतही या परिषदेत सविस्तर चर्चा होऊन २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चतय करण्यात आला.

जी- ७ देशांनी जगभरात कोरोना प्रतिबंधक लशींचे १ अब्ज डोस पुरविण्याचे जाहीर केले होते. यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून डोस वितरणालाही सुरुवात केली जाणार आहे. तसेच, पर्यावरण बदलाबाबत कृती करण्याचा वेगही वाढविला जाणार आहे.

G – 7 countries coming together against china

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात