विशेष प्रतिनिधी
साओ पावलो : मास्क न घातल्याबद्दल चक्क ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना १०० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. साओ पावलोमधील दुचाकी रॅलीदरम्यान त्यांनी कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केले आणि तसे करण्याची चिथावणी समर्थकांना दिल्याचे आढळून आले. शेकडो समर्थकांच्या सहभागामुळे रॅलीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. Police fined president for not wearing mask
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लागू झालेले विविध नियम बोल्सोनारो यांनी सतत धाब्यावर बसविले आहेत. बोल्सोनारो यांना गेल्या वर्षी कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी विलगीकरणात असूनही त्यांनी उद्यानात दुचाकीवरून फेरफटका मारला होता आणि पक्ष्यांना दाणे टाकले होते.
बोल्सोनारो यांनी रॅलीदरम्यान मास्कच्या वापरावर टीका केली. अतीउजव्या विचारसरणीच्या बोल्सोनारो यांनी चेहरा उघडा ठेवणारी हेल्मेट घातली होती. त्यांनी मास्क घातला नव्हता. वास्तविक ब्राझीलच्या आरोग्य खात्याने मास्कच्या सक्तीचे निर्बंध जारी केले आहेत. त्याचे पालन करण्याची तसदी बोल्सोनारो यांनी घेतली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App