कॉंग्रेसने आता स्वतःचे नाव अँटी-नॅशनल क्लबहाऊस करावे – संबित पात्रा यांची बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने आता आयएनसी (इंडियन नॅशनल काँग्रेस) हे नाव बदलून एएनसी (अँटी-नॅशनल क्लबहाऊस) असे करावे असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला. Sambit patra targets congress

सत्ता मिळाल्यास काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्याचा कॉंग्रेस विचार करेल असे वक्तव्य दिग्विजयसिंह यांनी नुकतेच केले. त्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका सुरु केली आहे.



एका पत्रकार परिषदेत पात्रा यांनी सांगितले की, या संवादाचे सूत्रसंचालक स्वतः दिग्विजय हेच होते. त्यांनीच तसा प्रश्न विचारण्यास पाकिस्तानी पत्रकाराला सांगितले. हा संवाद काँग्रेसच्या टुलकिटचा एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा द्वेष करणारे लोक आता भारताचाही द्वेष करू लागले आहेत.

पात्रा यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचाही संदर्भ दिला. ते म्हणाले की, हा केवळ अपघात होता असे दिग्विजय हेच म्हणाले होते. त्याआधी मुंबईवरील दहशतवादी हल्ले म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि याप्रकरणी पाकला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न केला होता.

Sambit patra targets congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात